टिओडी मराठी, मुंबई, दि. 21 ऑगस्ट 2021 – मुंबई येथील राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेडमध्ये अनेक पदांच्या जागा रिक्त आहेत. या जागांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.
यात व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक आणि अधिकारी या पदांचा समावेश केलेला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 04 सप्टेंबर 2021 आहे.
भरतीची पदे –
- व्यवस्थापक (Manager Finance)
- मुख्य व्यवस्थापक (Chief Manager Finance)
- अधिकारी (Officer Finance)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- व्यवस्थापक (Manager Finance) – सीए/ सीएमए किंवा वाणिज्य आणि लेखा/ वित्त विषयामध्ये नियमित आणि पूर्णवेळ पदवी घेतलेली असावी.
- मुख्य व्यवस्थापक (Chief Manager Finance) – सीए / सीएमए किंवा कॉमर्स, अकाउंटिंग / फायनान्स विषयात नियमित आणि पूर्णवेळ पदवी घेतलेली असावी.
- अधिकारी (Officer Finance) – सीए / सीएमए किंवा कॉमर्स, अकाउंटिंग / फायनान्स विषयामध्ये नियमित आणि पूर्णवेळ घेतलेली असावी.
एवढा मिळणार पगार –
- व्यवस्थापक (Manager Finance) – .70,000 – 2,00,000 रुपये प्रतिमहिना
- मुख्य व्यवस्थापक (Chief Manager Finance) – .90,000 – 2,40,000 रुपये प्रतिमहिना
- अधिकारी (Officer Finance) – 40,000 – 1,40,000 रुपये प्रतिमहिना
सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.