TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 21 ऑगस्ट 2021 – बालभारतीकडून जुने पुस्तके रद्दीमध्ये काढली जाताहेत. अभ्यासक्रम बदलल्यानंतर ही प्रक्रिया करावी लागते. मात्र, कोरोनामुळे बालभारतीने छापलेली पुस्तके गोदामाता पडून असून आता ही पुस्तके रद्दीत विक्रीला काढली आहेत. या पुस्तकांमध्ये कुठलेही नवीन अभ्यासक्रमाचे पुस्तक नाहीत. कोरोनामुळे शाळा सुरु न झाल्याने बालभारतीकडून 426 मेट्रिक टन पुस्तके रद्दीत विक्रीला काढलीत.

बालभारतीने नव्याने छापलेली लाखोंच्या संख्येने पुस्तके राज्यातील 9 विविध ठिकाणच्या गोदामामध्ये पडून आहेत. यात पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, अमरावती, पनवेल आणि नाशिक येथील बालभारतीच्या गोदामांचा समावेश आहे. या सर्व गोदामांत पडून असलेली पुस्तके आता रद्दीत काढणार आहेत.

अभ्यासक्रम बंद होऊन दोन वर्षे झाल्यामुळे ही पुस्तके गोदामांत पडून आहेत. अभ्यासक्रम बदलल्यानंतर ही पुस्तके क्लपिंग केली जातात. त्याचा लगदा केला जातो, ही पुस्तकं कोणालाही दिली जात नाहीत. याची जाहिरात काढून ही पुस्तक रद्दीत विकून टाकले जातात.

पुस्तके रद्दीमध्ये विक्रीसाठी काढण्यासाठी बालभारतीकडून जाहिरातही काढली आहे. दर तीन वर्षांनी ही प्रक्रिया केली जाते, अभ्यासक्रम बदलल्यानंतर शिल्लक ही पुस्तके आहेत. तसेच काही पुस्तके मुद्रण दोष असलेली आहेत, असे बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले आहे.