TOD Marathi

टिओडी मराठी, पुलगाव (वर्धा), दि. 23 ऑगस्ट 2021 – पुलगाव वर्धा येथील केंद्रीय दारुगोळा डेपोमध्ये विविध 21 पदे रिक्त आहेत. त्यामुळे या 21 पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केलेली आहे.

यात कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, फायरमॅन, ट्रेडडेमन, वाहन आणि टेलर या पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

भरतीची पदे –

  1. कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant)
  2. फायरमॅन (Fireman)
  3. ट्रेडडेमन (Tradesman)
  4. वाहन (Vehicle Mech)
  5. टेलर (Tailor)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  • कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant) – बारावी उत्तीर्ण असावे.
  • फायरमॅन (Fireman) – दहावी उत्तीर्ण असावे .
  • ट्रेडडेमन (Tradesman) – दहावी उत्तीर्ण असावे .
  • वाहन (Vehicle Mech) – दहावी उत्तीर्ण आणि ITI उत्तीर्ण असावे .
  • टेलर (Tailor) – दहावी उत्तीर्ण.आणि ITI उत्तीर्ण असावे .

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
केंद्रीय दारुगोळा डेपो, पुलगाव , जिल्हा-वर्धा, राज्य – महाराष्ट्र, पिन -442303

सविस्तर माहितीसाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

अधिकृत वेबसाईट- https://indianarmy.gov.in/home