टिओडी मराठी, काबुल, दि. 21 ऑगस्ट 2021 – अफगाणिस्तान देशावर कब्जा केल्यानंतर तालिबान हि संघटना पुन्हा डोके वर काढून होती, हे दिसून आले.
तालिबानच्या प्रमुख 7 म्होरक्यांपैकी एकाने भारतामध्ये प्रशिक्षण घेतले आहे, असे समोर आले आहे. शेर महंम्मद अब्बास स्टॅनिकझाय, असे या म्होरक्याचे नाव आहे. त्याने उत्तराखंडमधील इंडियन मिलीटरी अकॅडमीतून लष्करी प्रशिक्षण घेतले आहे. त्याचे सहअध्यायी त्याला ‘शेरू’ या टोपण नावाने ओळखत होते.
शेरू फार उंच नव्हता आणि धर्माबाबत तो कधीच कडवा नव्हता. अकॅडमीमधील भगत बटालियन केरेन कंपनीत विदेशी विद्यार्थी म्हणून दाखल झाला होता, तेंव्हा तो केवळ 20 वर्षांचा होता.
मुळचा पश्तुन वंशिय असलेल्या स्टॅनिकझाय याचा जन्म अफगाणिस्तानातील लोगार प्रांतामध्ये 1963 साली झाला होता. राज्यशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर तो डेहराडूनमध्ये लष्करी प्रशिक्षणासाठी दाखल झाला होता.
1970 मध्ये ‘इंडियन मिलीटरी अकॅडमी’द्वारे अफगाणी लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात होते. तो नेहमीत मिशा कापत होता, तो अगदी सामान्य अफगाणी विद्यार्थी होता, असे तेंव्हा त्याच्यासह प्रशिक्षण घेत असलेल्या अन्य उमेदवारांनी सांगितले.
अफगाण सैन्यामध्ये लष्करी सेवा केल्यानंतर आणि सोव्हिएत-अफगाण युद्ध लढल्यानंतर 1996 मध्ये त्याने अफगाण सैन्यातील नोकरी सोडली. त्यानंतर तो तालिबानमध्ये सामील झाला. उत्तम इंग्रजी व लष्करी प्रशिक्षण यामुळे तो तालिबानचे प्रमुख म्होरक्या बनला आहे.