National Instructional Media Institute मध्ये 318 जागांसाठी भरती ; जाणून घ्या, Selection Process

टिओडी मराठी, चेन्नई, दि. 19 जुलै 2021 – नॅशनल इंस्ट्रक्शनल मीडिया इन्स्टिटयूटमध्ये अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

कंसल्टंट्स या पदासाठी ही भरती होणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2021 हि असणार आहे. या नॅशनल इंस्ट्रक्शनल मीडिया इन्स्टिटयूटमध्ये ३१८ जागांसाठी भरती होणार आहे.

भरतीसाठीचे पदे :
कनिष्ठ व्यावसायिक सल्लागार – 240 पोस्ट
तांत्रिक सहाय्य सल्लागार – 48 पोस्ट
आयटी समर्थन सल्लागार – 30 पोस्ट

शैक्षणिक पात्रता :

  1. कनिष्ठ व्यावसायिक सल्लागार (Junior vocational consultant) – संबंधित क्षेत्रात पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम
  2. तांत्रिक सहाय्य सल्लागार(Technical support consultant) – अभियांत्रिकी पदवी / पदविका / बीबीए / एमबीए
  3. आयटी समर्थन सल्लागार (IT support consultant) – संगणक विज्ञान किंवा आयटीमध्ये बीई / बीटेक / एमटेक
  • एवढा मिळणार पगार :
    कनिष्ठ व्यावसायिक सल्लागार (Junior vocational consultant) – 35,000/- प्रतिमहिना
  • तांत्रिक सहाय्य सल्लागार(Technical support consultant) – 45,000/-प्रतिमहिना
  • आयटी समर्थन सल्लागार (IT support consultant) – 45,000/- प्रतिमहिना

अशी होईल निवड :
उमेदवाराला कम्प्युटर बेस्ड चाचणी द्यावी लागणार आहे. हि चाचणी ती 120 गुणांची असणार आहे. याशिवाय अनुभवावर गुणही दिले जाणार आहेत.

अधिक पाच वर्षांच्या अनुभवासाठी 20 गुण दिले जाणार आहेत. कनिष्ठ व्यावसायिक सल्लागार पदासाठी 100 गुणांची चाचणी असणार आहे.

  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 31 जुलै 2021 हि आहे.

या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी (https://nimi.gov.in/index.htm) इथे क्लिक करा.

Please follow and like us: