टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 27 मे 2021 – भारतीय लष्कराच्या ‘टेक्निकल’मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. हि उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. अधिकारी प्रशिक्षण अकादमीत (ओटीए) मंगळवारी (दि. 25) 57 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (तांत्रिक) मुख्य कोर्स आणि 28 व्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन (तांत्रिक) महिला कोर्सच्या एकूण 189 रिक्त जागांवरील भरतीसाठी अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.
आर्मी एसएससी (Technical) ऑक्टोबर 2021 भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार भारतीय सैन्य भरती पोर्टलवर joinindianarmy.nic.in ऑनलाइन अर्ज करु शकता. मात्र, ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2021 आहे.
अर्ज कसा करा :
उमेदवारांना सैन्य भरती पोर्टला भेट द्यावी. त्यानंतर, मुख्य पेजवर दिलेल्या अधिकारी प्रवेश अर्ज / लॉगइनच्या लिंकवर क्लिक करावे. यानंतर नवीन पेजवरील नव्या नोंदणीसाठीच्या दुव्यावर क्लिक करून संपूर्ण तपशील भरून नोंदणी करावी. त्यानंतर, उमेदवाराने नाव, पत्ता व शालेय शिक्षणाची माहिती अर्जात भरुन अर्ज सबमिट करा.
कोण अर्ज करू शकेल?
भारतीय सैन्यात एसएससी (तांत्रिक) प्रवेश मिळविण्यासाठी उमेदवारांने मान्यताप्राप्त संस्थेतून अभियांत्रिकीची पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अंतिम वर्ष / सेमिस्टरचे विद्यार्थी हि अर्ज करू शकतात. परंतु, त्यांना 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत पासिंग प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
या व्यतिरिक्त 1 ऑक्टोबर 2021 रोजी उमेदवारांचे वय 20 ते 27 वर्षांदरम्यान असावे. अर्थात उमेदवाराचा जन्म 2 ऑक्टोबर 1994 पूर्वी झाला नसावा व 1 ऑक्टोबर 2001 नंतरचा देखील नसावा.