TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 21 मे 2021 – कोरोनामुळे अनेक उद्योग, क्षेत्र ठप्प झाले आहेत. तर, काही हळूहळू सावरताना दिसत आहेत. अनेक क्षेत्रांत आता नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होत आहेत. केंद्र सरकारची एव्हिएशन कंपनी एअर इंडियात नोकरी मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अकाऊंट्स आणि फायनान्सची शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलीय.

एअर इंडिया एअरपोर्ट सर्विसेसने विविध पदांवर भरती सुरू केलीय. उमेदवाराने निवड केल्यानुसार देशातील मेट्रो शहरे दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा कोलकातामध्ये पोस्टिंग देण्यात येणार आहे. तसेच पगारही आकर्षक मिळणार आहे, असे सांगितले जात आहे.

यासाठी आहे पात्रता :
सामान्य ग्रॅज्युएट (फायनान्स किंवा अकाउंट्समध्ये किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक) ते एमबीए, सीए इंटर आणि चार्टर्ड अकाउंटंटपर्यंत शैक्षणिक पात्रता असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता ते नोटिफिकेशनमध्ये दिले आहे.

पदांची माहिती व पगार :
मॅनेजर (फायनान्स) ४ पदे, ऑफिसर (अकाउंट्स) ७ पदे, असिस्टंट (अकाउंट्स) ४ पदे अशा एकूण १५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मॅनजेर पदासाठी ५० हजार रुपयांपर्यंत मासिक पगार, ऑफिसर पदासाठी ३२ हजार २०० रुपयांपर्यंत मासिक पगार, तर असिस्टंट पदासाठी २१ हजार ३०० रुपयांपर्यंत मासिक पगार दिला जाणार आहे.

असा करा अर्ज? :
एयर इंडियाच्या या नोकरीसाठी कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवाराने जमा केलेले अर्ज स्क्रीनिंग करून आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे निवड केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करावा.

अॅप्लिकेशन फॉर्म नोटिफिकेशन लिंकमधून डाऊनलोड करा. प्रिंटआऊट काढून तो भरून सॉफ्टकॉपी एअर इंडियाच्या ईमेल आयडी hrhq.aiasl@airindia.in वर पाठवा.

ई-मेल अॅप्लिकेशन फॉर्मसह सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोड. अर्जांसाठी कोणतेही शुल्क नाही. अर्ज करण्याची अंतिम मुदत 1 जून 2021 अशी आहे.