TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 27 मे 2021 – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक चांगली संधी आली आहे. भारतीय जीवन विमा निगम अर्थात LIC च्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये असोसिएट पदावर भरती प्रक्रिया सुरु झालीय. एलआयसीच्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरु असून ज्या उमदेवारांना अर्ज करायचा असे ते ऑफिशियल वेबसाईट www.lichousing.com वर भेट देऊन अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 जून :
एलआयसी हाऊसिंगद्वारे असोसिएट पदावर भरती सुरु असून याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक 9 लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाईल. एलआयसी हाऊसिंगमध्ये अर्ज करण्यास 24 मे 2021 पासून सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 जून 2021 आहे. अर्ज करण्यासाठी उमेवारांनी एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या वेबसाईटवर भेट द्यावी. आणि पूर्ण जाहिरात वाचून घेऊन अर्ज करावा.

जाणून घ्या, पात्रता:
एलआयसी हाऊसिंगने दिलेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवाराचे शिक्षण सोशल वर्क किंवा ग्रामीण व्यवस्थापनमध्ये झालं आहे, ते अर्ज करु शकतात. त्यांना संबंधित अभ्यासक्रमात 55 टक्के गुण मिळालेले असावेत. सोशल वर्क आणि ग्रामीण व्यवस्थापनातील मास्टर्स डिग्री असणारे उमदेवार देखील अर्ज करु शकतात. त्यांचे 1 जानेवारी 2021 रोजी वय 23 ते 30 वर्ष या दरम्यानं असावे.

असा करा अर्ज :
1: प्रथम एलआयसी हाऊसिंगच्या वेबसाईटला भेट द्यावी.
2: तिथे करिअर लिंकवर क्लिक करावे.
3: यानंतर Job Opportunities वर क्लिक करावे.
4: To Apply Online Click Here वर क्लिक करावे.
5: आता रजिस्ट्रेशन करुन अर्ज सादर करावा.
6:सादर केलेल्या अर्जाची प्रत प्रिंट करुन सोबत ठेवावी.

अशी आहे निवड प्रक्रिया :
असोसिएट पदावरील नियुक्तीसाठी उमदेवारांची ऑनलाईन टेस्ट घेणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर करुन मुलाखत होईल. यानंतर उमदेवारांची निवड करण्यात येईल. एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड असोसिएट पदासाठी अर्ज करण्यापूर्वी परीक्षेचे स्वरुप आदी बाबी वाचून घ्याव्यात.