TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 29 मे 2021 – भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वांत मोठी खासगी बँक म्हणून ओळख असलेल्या HDFC बँकेला १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. नियामक टप्प्यातील कमतरता आणि बँकेने ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराची वैधता यावर स्थिती स्पष्ट केली नाही. त्यामुळे आरबीआयने ही कारवाई केल्याचे सांगितले आहे.

HDFC बँकेच्या वाहन कर्ज पोर्टफोलिओत काहीतरी गडबड झाल्याबद्दल एका व्हिसलब्लोअरने भारतीय रिझर्व्ह बँकेकडे यासंदर्भातील तक्रार केली होती. याच्या आधारावर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून थर्ड पार्टी नॉन फाइनेंशियल प्रोडक्ट्स-आर्थिक उत्पादनांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. या तपासात काही त्रुटी आढळल्या. म्हणून या प्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने कारणे दाखवा नोटीस बजावून उत्तर मागितले.

मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने बजावलेल्या नोटिसीला एचडीएफसी बँकेकडून उत्तर दिले नाही. तसेच दिलेल्या त्या उत्तरावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे समाधान झाले नाही. यामुळे अखेर तपासादरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्याने HDFC बँकेला १० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. एका अहवालानुसार, बँक ग्राहकांना वाहन कर्ज मंजूर करताना पारदर्शक व्यवहार करत नव्हती, हे स्पष्ट दिसून आले.

या दरम्यान, देशातील सर्वात मोठी खासगी बँक वाहन कर्जाशी संबंधित नियमांचे पालन करीत नाही, असे दिसून आले. तसेच भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ६(२) आणि कलम ८ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे HDFC बँकेला हा दंड ठोठावला आहे, असे सांगितले जात आहे.