टिओडी मराठी, दि. 30 मे 2021 – टपाल विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या ग्रामीण डाकसेवक नोकर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय अखेर घेतला आहे. त्यामुळे इच्छुक डाकसेवक नोकर भरतीसाठी अजूनही अर्ज करू शकतात.
आता 10 जून 2021 पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. राज्यात लॉकडाऊन सुरु असल्याने अनेकांना या भरतीसाठी अर्ज करता आले नाहीत, त्यामुळे टपाल विभाग स्थानीय लोकाधिकार माध्यमातून अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
लॉकडाऊन सुरु असल्याने अनेक ठिकाणी सायबर कॅफे आदी दुकाने बंद असल्यामुळे उमेदवारांना अर्ज करता आले नाहीत.
त्यामुळे मागणीची गंभीर दखल घेत ही अर्ज करण्याची मुदत 10 जून 2021 पर्यंत वाढविली आहे. या संधीचा लाभ बेरोजगार भूमिपुत्रांनी घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष अजय माने आणि सरचिटणीस अजित परब यांनी केले आहे.
More Stories
देवेंद्र फडणवीस १० तासांनी मुंबईत परतले, आज मोठा निर्णय होणार?
अग्निवीरांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय
दहावीच्या निकाल जाहीर; निकालात मुलींची बाजी, तर राज्याचा एकूण निकाल 96.94 टक्के इतका