TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 जून 2021 – देशात करोनाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी झालीय. मात्र, अद्याप दुसरी लाट संपलेली नाही. त्यात करोनाची तिसरी लाट येणार आहे, असा अंदाजही अनेक तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा वर्तविला आहे. सरकारी यंत्रणाही तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झालीय. मात्र, उद्योगपती राकेश झुनझुनवाला यांनी तिसऱ्या लाटेसंदर्भात मोठा दावा केलाय. ते म्हणतात, पैज लावून सांगतो, करोनाची तिसरी लाट येणार नाही.

भारतात करोनाची तिसरी लाट येणार नाही, असा दावा झुनझुनवाला यांनी केलाय. पैंज लावून आपण हा दावा करण्यास तयार आहे, असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे तिसरी लाट येईल म्हणून मार्केटमधील गुतंवणूकदारांनी काळजी करू नये, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.

याअगोदर कोणीही करोनाच्या दोन लाटा येतील, अशी भविष्यवाणी नव्हती केली. मात्र, आता प्रत्येकजण करोनाची तिसरी लाट येणार अशी शक्यता व्यक्त करत आहेत. मात्र, ज्या गतीने लसीकरण सुरू आहे आणि आपण ज्या पद्धतीने प्रतिकारशक्ती वाढवत आहोत, त्यावरून करोनाची तिसरी लाट येण्याची शुक्यता नाही, असे झुनझुनवाला यांनी नमूद केलंय. देशात आतापर्यंत करोना लसीचे २८ कोटींहून अधिक लसीचे डोस दिलेत.

यादरम्यान, तिसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही. उलट काही सुधारणा होऊ शकतात. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे झुनझुनवाला यांनी नमूद केलंय. तसेच तिसरी लाट येवो अथवा न येवो, भारतीय अर्थव्यवस्था कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असल्याचे सांगत करोनाची तिसरी लाट येणार नाही, याचा झुनझुनवाला यांनी पुनरोच्चार केलाय.