Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
'टायटन'मुळे राकेश झुनझुनवालांनी तासाभरात कमावले ६०० कोटी

TOD Marathi

देशातील नावाजलेले गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्यासाठी आजचा दिवस मोठा ठरला आहे. आज गुरुवारी टायटनच्या शेअरमध्ये ७ टक्के वाढ झाली. या तेजीच्या लाटेत झुनझुनवाला यांनी तब्बल ६०० कोटी कमावले. (Rakesh Jhunjhunwala earns 600 Crore) टाटा समूहातील कंपनी असलेल्या टायटनमध्ये राकेश आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांची मार्च २०२२ अखेर टायटनमध्ये एकूण ५.०५ टक्के हिस्सेदारी आहे. दिर्घकाळापासून झुनझुनवाला दाम्पत्य टायटन कंपनीचे हिस्सेदार आहेत. (Rakesh Jhunjhunwala and Rekha Jhunjhunwala share holder of Titan company)

सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या (Mumbai share market) मंचावर टायटन कंपनी लिमिटेडचा शेअर २,१७०.९५ रुपयांवर गेला होता. त्यात ७ % वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर टायटनचा शेअर ६.८६ टक्क्यांनी वाढला आणि तो २,१५१.६० रुपयांवर गेला. या तेजीने झुनझुनवालांच्या संपत्तीत आणखी ६०० कोटींची भर पडली.

या तेजीनंतर टायटनचे बाजार भांडवलही १२,००० कोटींनी वाढले. टायटनचे एकूण बाजार भांडवल १.९१ लाख कोटींवर गेले आहे. याआधीच्या सत्रात टायटनचे बाजार भांडवल १.७९ लाख कोटी एवढे होते. झुनझुनवाला यांची टायटनमधील गुंतवणूक बुधवारी ९,०२६ कोटी इतकी होती. गेल्या दोन महिन्यात टायटनच्या शेअरमध्ये घसरण झाली होती. त्यामुळे झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीबाबत विश्लेषक आपली मते व्यक्त करत होते. मात्र मागील आर्थिक वर्षाच्या दमदार कामगिरीने आज शेअरला तेजीची झळाळी मिळाली.

टायटनच्या कामगिरीमध्ये गेल्या आर्थिक वर्षात चांगलीच वाढ झाली आहे. ज्वेलरी व्यवसायात मागील वर्षात २०७ टक्के एवढी वृद्धी झाली. मे महिन्यात अक्षय्य तृतीयेला दागिने विक्रीत मोठी वाढ झाल्याचे कंपनीनं म्हटलं आहे. त्याशिवाय वर्षभरात कंपनीने १९ नवीन दालने सुरु केली होती. टायटनचा वॉच आणि आयवेअर व्यवसायात देखील चांगली वृद्धी झाली. गेल्या वर्षभरात टायटनच्या घड्याळ्याच्या व्यवसायात जवळपास १५८ टक्के वृद्धी झाली. चष्मे व्यवसायात १७६ टक्के वृद्धी झाल्याचेही कंपनीनं म्हटलं आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज