TOD Marathi

टिओडी मराठी, पुणे, दि. 22 जून 2021 – ‘भीम आर्मी’ या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक, नेते चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण येत्या 26 जून रोजी पुण्यामध्ये येणार आहेत, असे ‘भीम आर्मी’चे पुणे शहराध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी सांगितले आहे. मागील वर्षी आझाद हे पुणे दौऱ्यावर आले होते.

चंद्रशेखर आझाद 26 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजता लोहगाव विमातळावर आगमन होणार आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जाऊन राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतनिमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत.

यावेळी पुण्यातील प्रमुख कार्यकर्ते बरोबर असणार आहेत. अभिवादन कार्यक्रमानंतर पुणे शहरातील पदाधिकारी यांच्या बरोबर शहर मेळावा आणि महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

या बैठकीत अनुसूचित जाती जमातीच्या विविध प्रश्नांवर आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.

यावेळी पुणे शहरातील विविध पक्ष, संघटनाचे प्रमुख पदाधिकारी ‘भीम आर्मी’ संघटनेमध्ये आझाद यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश करणार आहे, असे ‘भीम आर्मी’ पुणे शहराध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.