TOD Marathi

मुंबई : राज्यसभा निवडणुकीला अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. याच पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार फुटू नयेत म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी आता मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. अशातच दुसरीकडे मनसेचे आमदार राजू पाटील नॉट रिचेबल असल्यानं राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत होत्या.

राजू पाटील हे स्वतः नॉटरिचेबल होते की कोणत्या पक्षाच्या सांगण्यावरून ते असं करत होते, अशाही चर्चा केल्या जात होत्या. मग मात्र आता यावर स्वतः राजू पाटील यांनी अधिकृत ट्विटरवर ट्विट करत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. चिंता नसावी. राज साहेबांचा आदेश प्रमाण आहे, असं पाटील यांनी सांगितलं आहे.

इतकंच नव्हे तर मी माणूस आहे घोडा नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने छोटे पक्षी आणि अपक्षांचा भाव चांगलाच वधारला आहे. मनसेचे मनसेचे एक नवे नेते राजू पाटील यांचेही मत यासाठी महत्त्वाचं असणार आहे.

राज ठाकरे यांच्याशी बोलून भाजप मत आपल्याकडे खेचणार? की शिवसेनेचा नेता पाटलांचं मत पदरात पाडून घेणार? अशी चर्चा सुरू होती. मात्र राज ठाकरेंचा निर्णयच अंतिम असणार असल्याचं आता राजू पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.