TOD Marathi

मागच्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajaktta Mali ) तिच्या रानबाजार या वेबसिरीजमुळे चांगलीच चर्चेत आहे. रानबाजारमधील तिच्या भूमिकेचे समीक्षकांकडून कौतुक झालं तर दुसरीकडे नेटकऱ्यांना तिचा बोल्ड अंदाज हा फारसा रूचला नाही. यामुळं तिला ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागला. मात्र असं जरी असलं तरी या सिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच प्राजक्तानं य़ा सीरिजबद्दल एक पोस्ट केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

या वेबसिरीजमधील तिने तिच्या आवडत्या सीनबद्दल हि पोस्ट लिहिली आहे. मागच्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. पण कालचा भाग प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांकडून तिचं कौतुक होत आहे. कमेंट बॉक्स प्राजक्ताच्या कौतुकानं भरून गेला आहे.