TOD Marathi

 

अभिनेता कार्तिक आर्यन कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. कार्तिक आर्यन यावर्षी IIFA 2022 मध्ये सहभागी होणार होता, परंतु त्याआधी त्याने त्याची  कोविड चाचणी केली ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कार्तिक आयफा 2022 मध्ये शानदार परफॉर्मन्स देणार होता पण आता तो कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही. या अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर कोविड-19 साठी पॉझिटिव्ह चाचणी झाल्याची बातमी शेअर केली आहे. त्याच्या इन्स्टा स्टोरीमध्ये त्याने “कोविड पॉझिटिव्ह” लिहिले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी हे  ‘भूल भुलैया 2’ बॉक्स ऑफिसवर आपली दमदार कामगिरी करत आहे. ‘भूल भुलैया 2’ ने तिसर्‍या शुक्रवारी सुमारे 2.75 कोटी रुपयांची कमाई केली आणि चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 143 कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाने 175 कोटी रुपयांच्या टप्पा जवळपास पूर्ण करण्याची अपेक्षा आहे.