TOD Marathi

बजाज ग्रुप उद्योग समूहाचे चेअरमन व भारतीय संसदेच्या राज्यसभेचे सदस्य राहुल बजाज हे भारतीय उद्योजकांमध्ये एक नामांकित नाव आपण ऐकले असालच. काल १२ फेब्रुवारी ला पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांचं दुखःद निधन झालं.
आपल्या स्पष्ट भूमिकेसाठी राहुल बजाज उद्योग जगतात प्रसिद्ध होते. गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारूपाला आणण्यात राहुल बजाज यांचं मोठं योगदान ठरले आहे.

३० नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या एका इकॉनॉमिक टाइम्स अवॉर्ड शो मध्ये त्यांनी अमित शाह यांना काही प्रश्न विचारले. त्यावेळी राहुल बजाज म्हणाले की ‘देशात एक भीतीच वातावरण आहे दहशतवाद हा शब्द जरी चुकीचा आला तरी देखील हे वातावरण आपल्या सर्वांच्या मनात नक्कीच आहे आणि कोणीही त्याबद्दल बोलणार नाही, कोणीही यावर बोलणार नाहीत.’

राहुल बजाज यांच्या प्रश्नांला उत्तर देत अमित शहा म्हणाले की ‘कोणालाही घाबरण्याची गरज नाही. नरेंद्र मोदींच्या आणि आमच्या सरकारवर अनेक वृत्तपत्रांनी अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. आजही खूप लिहिलं जात आहे . जर कोणी असेल ज्याच्या विरोधात सर्वात जास्त लिहिले गेले असेल तर ते आपण आहोत. तरीही वातावरण निर्माण झाले आहे असे म्हणाल तर वातावरण सुधारण्याचे कामही आपल्यालाच करावे लागेल. कोणालाही घाबरण्याची गरज नाही किंवा कोणालाही घाबरवायचे नाही असही ते यादरम्यान म्हणाले.. तसेच आम्ही असे काही केले नाही की ज्यावर टीका होण्याची आम्हाला चिंता करावी लागेल. आम्ही सर्वात पारदर्शक सरकार आहोत आणि आम्ही विरोधाला घाबरत नाही.
त्यानंतर प्रज्ञा ठाकूर बद्दल बोलताना बजाज म्हणाले की आजकाल आपल्याला कोणालाही देशभक्त म्हणता येईल.. अगदी गांधीजींची ज्यांनी गोळ्या घालून हत्त्या केली त्यांना देखील देशभक्त म्हणता येईल. प्रज्ञा ठाकूर यांना तिकीट मिळाल आणि त्या निवडून देखील आल्या. प्रधान मंत्री म्हणाले होते अशा एखाद्याला माफ करणं माझ्यासाठी कठीण जाईल’ तरी देखील तिला समितीत परत आणण्यात आले.’ अस राहुल बजाज अमित शाह यांना प्रश्न विचारताना म्हणाले.
त्यावर शहा यांनी उत्तर दिले, “साध्वी प्रज्ञा यांचे वक्तव्य येताच भाजपमधील वरिष्ठ नेत्यांनी त्यावर टीका केली आणि पावले उचलली आणि नंतर तिने माफी मागितली. ती उधमसिंग की गोडसेबद्दल बोलली हा संभ्रम होता पण वस्तुस्थिती अशी आहे की अशा विधानाला सरकार किंवा भाजपचे समर्थन नाही. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो आणि असे म्हणण्यास आम्ही मागेपुढे पाहत नाही.”

इकॉनॉमिक टाइम्स चा ह्या अवॉर्ड शो मध्ये झालेल्या या चर्चासत्रानंतर चर्चेला चांगलाच उधाण आलेले होत.