TOD Marathi

लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’ मधून हा कलाकार खरंच बाहेर पडला का?

संबंधित बातम्या

No Post Found

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय असलेला कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya)ने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे.या कॉमेडी शोचा भारतभरच नाही तर जगभरातही मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. या शोमधल्या प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून आपली वेगळी अशी छबी निर्माण केली आहे.या सर्व कलाकारांनी आपल्या विनोदांच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना आजवर खळखळून हसवले आहे. या शोमधून निलेश साबळे (Nilesh Sable), भाऊ कदम (Bhau Kadam), कुशल बद्रिके (Kushal Badrike), श्रेया बुगडे (Shreya Bugde), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), सागर कारंडे (Sagar Karande) हे कलाकार आपल्या अभिनयाच्या साहाय्याने घराघरात पोहचले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सागर कारंडे (Sagar Karande)याने हा शो सोडल्याची चर्चा सगळीकडे ऐकायला मिळत होती. मात्र याबाबतचा नेमका खुलासा काय हे सागर कारंडेने केला आहे. हा खुलासा करताना तो म्हणाला की, ही निव्वळ अफवा आहे. यात अजिबात तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. कारण नाटकांचे प्रयोग हे फक्त शनिवारी आणि रविवारी असतात. चला हवा येऊ द्याचे शूटिंग सोमवारी, मंगळवारी होत असते. सोमवार आणि मंगळवारी कोणत्याच नाटकाचे प्रयोग होत नाहीत, कारण लोकांना त्यादिवशी सुट्टी नसल्यामुळे ते प्रयोग पाहायला येत नाहीत. त्यामुळे मी नाटकातही काम करतो आहे आणि चला हवा येऊ द्या शोमध्ये देखील. माझे नाटक आणि शो या दोन्हीचे काम अगदी सुरळीत सुरू आहे असं सांगत सागर कारंडे ने या चर्चेत अजिबात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

जाणून घ्या सागर कारंडे नेमका काय म्हणाला..
अभिनेता सागर कारंडे सध्या चला हवा येऊ द्या या शो व्यतिरिक्त ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ आणि ‘इशारो इशारो में’ या नाटकात काम करताना आपल्याला दिसतो आहे. नाटकांच्या प्रयोगांमुळे त्याने शो सोडला असल्याची चर्चा सगळीकडे रंगली होती. मात्र याबाबतचा खुलासा सागर कारंडेने नुकताच केला आहे.तो म्हणाला की, ही निव्वळ अफवा असून या वृत्तात अजिबात तथ्य नाही. कारण नाटकांचे प्रयोग हे फक्त शनिवारी आणि रविवारी असतात. चला हवा येऊ द्याचे शूटिंग सोमवारी, मंगळवारी असते. सोमवार आणि मंगळवारी कोणत्याच नाटकाचे प्रयोग होत नाहीत, कारण लोकांना त्यादिवशी सुट्टी नसल्यामुळे ते प्रयोग पाहायला येत नाहीत. त्यामुळे मी नाटकातही काम करतो आहे आणि चला हवा येऊ द्या शोमध्ये देखील. माझे नाटक आणि शो या दोन्हीचे काम अगदी सुरळीत सुरू आहे.