TOD Marathi

बंगळुरु : टाटा आयपीएल (TATA IPL) च्या १५ व्या पर्वासाठी बँगलोर येथे सध्या लिलाव (IPL Mega Auction) सुरु आहे. आज दुपारी १२ वाजल्यापासून ऑक्शनला सुरुवात झाली आहे. सकाळ पासून आतापर्यंत जवळपास २५ ते ३० खेळाडूंचा लिलाव पूर्ण झाला आहे. मात्र हा लिलाव सुरु असताना एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आले आहे .ह्या लिलावाचे ऑक्शनर ह्युज एडमेड्स त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले. त्यामुळे लिलावादरम्यान मेडिकल इमरजन्सी निर्माण झाली आहे.
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिन्दु हसारंगा ह्याच्यावर बोली लावत असताना ही घटना घडल्याचं समोर आले आहे. त्यामुळे ह्या लिलावाला सध्या थांबवण्यात आले आहे. दरम्यान, एडमीड्स यांची तब्येत आता कशी आहे, याबाबतची कोणतीही माहिती बीसीसीआय किंवा आयपीएलच्या आयोजकांकडून अद्यापही देण्यात आलेली नाही . ह्यू एडमीड्स हे मूळचे ब्रिटीश ऑक्शनर आहेत आणि ते ६३ वर्षांचे आहेत. ह्या घटनेनंतर दुपारी २:३० ते ३:३० ही वेळ दुपारच्या जेवणासाठीची असल्याने आता संबंधित लोक आणि सर्व फ्रँचायझी मालक जेवणासाठी गेले आहेत. त्यामुळे ३:३० नंतरच आता उर्वरित लिलाव प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता आहे.

ह्यू एडमीड्स यांचा आता पर्यंतचा अनुभव..
ह्यू एडमीड्स यांना ऑक्शन आयोजित करण्याचा गेल्या ३५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव असल्याचं कळते .त्यांनी २.७ बिलियन पौंड्सच्या तब्बल ३१,०००० लॉट पेक्षा जास्त खेळाडू, वस्तू आणि इतर गोष्टींचं ऑक्शन केल आहे. याशिवाय त्यांनी जागतिक स्तरावर आजपर्यंत २५०० हून अधिक ऑक्शन मध्ये सुत्रसंचालन केलं आहे.