‘त्या’ घोषणांच्या व्हिडिओचा फॉरेन्सिक तपास होणार

पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या (Popular Front Of India) समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन केले होते. या आंदोलनानंतर बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, ‘पाकिस्तान झिंदाबाद’ (Pakistan Zindabad) अशा घोषणा दिल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर या व्हिडिओचा फॉरेंसिक तपास होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुणे पोलीस उपायुक्त सागर पाटील या संदर्भात माहिती देताना म्हणाले, सोशल मीडिया मधून जे व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जी घटना घडली त्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया वरून जे काही व्हिडिओ आहेत, ते तपासले जाणार आहेत आणि या अनुषंगाने या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. तपासात ज्या गोष्टी निष्पन्न होतील, त्यानुसार जे काही कलमं असतील ते आम्ही ॲड करणार आहोत.

पोलिसांची भूमिका कडक आहे, जे लोक दोषी निष्पन्न होतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणेचा निषेध करण्यासाठी पुण्यात मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी वंदे मातरम..(Vande Mataram) पाकिस्तान मुर्दाबाद, पीएफआय (PFI) मुर्दाबाद… अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच काहींनी पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळून संताप व्यक्त केला.

Please follow and like us: