TOD Marathi

गेले काही दिवस तपास यंत्रणांच्या रडावर असलेल्या पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front Of India banned for 5 years) या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. दहशतवादाशी संबंध असल्याने केंद्र सरकारने ही मोठी कारवाई केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीएफआशी संबंधित सहा अन्य संघटनांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

पीएफआय या संघटनेवर पाच वर्षांची बंदी घातल्यानंतर केंद्र सरकारने या संघटनेला आणखी एक दणका दिला आहे. पीएफआयशी संबंधित देशभरातील 34 बँक खाती NIA कडून गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे आता पीएफआयचं आर्थिक कंबरडं मोडण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. (NIA freezed 34 accounts of PFI across nation)

केंद्रीय तपास यंत्रणांनी गेल्या आठ दिवसात दोन वेळा देशभरात पीएफआयशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले आणि यामध्ये शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अटक केली.

देश विरोधात कट रचल्याचा आणि टेरर फंडिंग सारखे गंभीर आरोप या संघटनेवर आहेत, त्यामुळे केंद्र सरकारने या संघटनेविरोधात मोठे पाऊल उचललं आणि पीएफआयसह सहा सहयोगी संघटनांवर पाच वर्षांची बंदी घातली आहे. त्यातच त्यांची देशभरातील 34 बँक खाती गोठवण्यात आली आहेत. दोन आठवड्यांपूर्वी ईडीने देशातील अनेक भागात पीएफआयच्या परिसरावर छापे टाकले होते. यानंतर पीएफआआयच्या चार महत्त्वाच्या सदस्यांना अटक देखील केली होती.