TOD Marathi

पी एफ आय ( PFI)  या संघटनेवर केंद्रीय गृह मंत्रालयाने पाच वर्षांसाठी बंदी घातली. ही बंदी घातल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) यांचे आभार व्यक्त केले. पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनेही या संघटनेवर बंदी घातल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि लाडू वाटून जल्लोष केला.

अशा संघटनेवर पाच वर्ष नव्हे तर पूर्ण वेळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी यावेळी केली. पी एफ आय वर बंदी घातली या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही प्रकारचे देश विरोधी कृत्य खपवून घेणार नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या नेतृत्वात आम्ही देशहितार्थ कार्य करत राहु अशी प्रतिक्रिया उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मोठ्या प्रमाणात यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे शहरातील अलका टॉकीज चौकात हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रस्त्यावरून जाणारे प्रवासी नागरिक यांना लाडू पेढे भरवून आणि फटाक्यांची आतषबाजी करून मनसेच्या वतीने पीएफआयवर बंदी घातल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.