प्राजक्ता मुलाच्या नाही तर …… प्रेमात आहे!

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या लंडनमध्ये तिच्याआगामी नव्या सिनेमाचं शुटींग करत आहे.

शुटींगदरम्यान प्राजक्तानं लंडनमधील अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट दिली असुन त्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे

प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतं प्राजक्ताने नुकताच तिच्या लंडन ट्रीप चे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

प्राजक्ताच्या वैयक्तिक आयुष्य बद्दल बोलायचं झालं तर मधल्या काळात तिच्या ब्रेकअपच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.

प्राजक्ता सोशल मीडियावर सर्वकाही शेअर करत असते मात्र प्राजक्तानं आजवर तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फारसा खुलासा केलेला नाही.


पण वाय सिनेमाच्या प्रमोशनवेळी एका मुलाखतीत प्राजक्तानं सिनेमाच्या शुटींगवेळी तिचं ब्रेक अप झाल्याचं सांगितलं होतं.

सध्या लंडनमध्ये असलेल्या प्राजक्तानं तिच्या खऱ्या प्रेमाची कबुली दिली आहे.

प्राजक्तानं म्हटलंय, ‘मैं जहाँ रहूँ…मैं कहीं भी हूँ… तेरी याद साथ है. या ओळी वाचून प्राजक्ता प्रेमात पडल्याचं वाटत आहे. आणि प्राजक्ताच्या या कॅप्शन ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पण प्राजक्तानं कुण्या व्यक्तीच्या नाही तर भारत देशाच्या प्रेमात आहे. पोस्टच्या शेवटी तळटीप लिहित प्राजक्तानं म्हटलंय, ‘गैरसमज नसावा, प्रिय भारताला उद्देशून म्हणतेय’.

सध्या प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.

Please follow and like us: