TOD Marathi

दिल्ली: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नेस्को मैदानावर सभा घेत भाजपसह शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत शिवसेनेच्याच अन्य राज्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, मी विविध राज्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांना भेटायला आलेलो आहे. आजचा दिवस हा खरच ऐतिहासिक आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. यासह विविध मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं.

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:

◆ जगातील 33 देशांनी आमच्या उठावाची दखल घेतली.

◆ आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे.

◆ राज्य प्रमुखांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आलेलो आहे.

◆ आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार आहोत.

◆ सत्ता सोडून उठाव करणारे आम्ही पहिले आहोत.

◆ जनतेचे मतदान युतीला केलं मात्र काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आम्ही गेलो.

◆ आम्ही सत्तेत होतो मात्र शिवसैनिकांवर अन्याय होत होता.

◆ ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्यांनीच जबाबदारी घेतली नाही.

◆ अन्यायाची परिसीमा असते म्हणून हा उठाव झाला.

◆ मी चुकीचा वागलो असतो तर लाखोंचा पाठिंबा मिळाला नसता.

◆ मुख्यमंत्री पदाच्या मोहापायी महाविकास आघाडी स्थापन केली.

◆ बाळासाहेबांनी सत्तेसाठी विचारधारेशी कधी तडजोड केली नाही.

अशा पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आणि आपणच बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणार आहोत लोकांचा आपल्याला पाठिंबा मिळतोय असं वक्तव्य केलं.