TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 20 जुलै 2021 – फेब्रुवारीत उघडकीस आलेल्या पॉर्न चित्रपट निर्मिती व पॉर्न अ‍ॅप्स प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री कारवाई केली. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक केली आहे. राज कुंद्राला अटक केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या आणखी एकाला गजाआड केलं आहे. रायन जॉन थार्प असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

नवी मुंबईतील नेरूळमधून त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिलीय. अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे व ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रासह आणखी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत ११ जणांना अटक केलेली आहे. यातील काही जामीनावर सुटलेत.

पॉर्न फिल्म्स निर्मिती रॅकेट प्रकरणामध्ये पोलिसांनी सोमवारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीच पती राज कुंद्रा याला अटक केलीय. मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलने उद्योगपती राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं.

सात ते आठ तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी हि अटकेची कारवाई केली आहे. पॉर्न फिल्म्स निर्मितीमध्ये राज कुंद्रा मुख्य सुत्रधार आहे, असं पोलिसांनी आतापर्यंत हाती आलेल्या पुराव्यांच्या आधारे म्हटलं होतं. राज कुंद्राला अटक केल्यानंतर पोलिसांनी आणखी एकाला अर्थात रायन जॉन याला अटक केलीय.

रायन थार्प विरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रायन थार्पचे थेट राज कुंद्रा याच्यासोबत संबंध आहेत, अशी माहिती समोर आली आहे. रायनही पॉर्न चित्रपट निर्मितीत सहभागी होता. दोघांनाही आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

जाणून घ्या, काय आहे प्रकरण?
फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ इथल्या ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई केली होती.

त्यावेळी पोलिसांनी ५ जणांना अटक करून यातून एका मुलीची सुटका केली होती. अटक केलेल्या ५ जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे, असे आढळून आलं होतं.

या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रामध्ये नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.