TOD Marathi

Mumbai Metro मध्ये Engineers पदाच्या जागा रिक्त ; ‘या’ पदांची होणार भरती ; असा करा अर्ज

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, मुंबई, दि. 20 जुलै 2021 – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये इंजिनिअर्स पदांच्या 19 जागा रिक्त आहेत. यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी केली आहे.

जुनिअर इंजिनिअर व डेप्युटी इंजिनिअर या पदांसाठी ही भरती होणार आहे. मेट्रोमध्ये आता 19 जागांसाठी ही भरती असणार आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 22 ऑगस्ट 2021 हि आहे.

हि पदे भरणार :
(Junior Engineer) जुनिअर इंजिनिअर
(Deputy Engineer) डेप्युटी इंजिनिअर

अशी हवी शैक्षणिक पात्रता :

  • (Junior Engineer) जुनिअर इंजिनिअर – मान्यताप्राप्त कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक.
  • (Deputy Engineer) डेप्युटी इंजिनिअर – मान्यताप्राप्त कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिग्री आवश्यक.

हा आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता :
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, एमएमआरसीएल – लाईन 3 ट्रान्झिट ऑफिस, ई ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2021

सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा.

तसेच नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी ( https://www.mmrcl.com/sites/default/files/Advt.%202021%20-%2004-%20Website%20copy%20%281%29.pdf ) इथे क्लिक करा.

या पद भरतीसाठी अर्ज करण्यासाठी (https://www.mmrcl.com/en/user/register) इथे क्लिक करा.