Pegasus case : Rajya Sabha मध्ये गदारोळ, TMC खासदाराने केंद्रीय मंत्र्यांच्या हातातील कागद घेऊन फाडला, शाब्दिक चकमक, मार्शलला बोलावले

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 22 जुलै 2021 – संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान दोन्ही सभागृहामध्ये गदारोळ पाहायला मिळाला. गुरुवारी विरोधी खासदारांनी पेगासस गुप्तहेरी प्रकरणासह अनेक मुद्द्यावरुन जोरदार प्रदर्शन करण्यात आले. यावेळी पेगासस प्रकरणावर राज्यसभेत बोलताना IT मंत्री अश्विनी वैष्णव यांना आपले बोलणे थांबवावे लागले.

अश्विनी वैष्णव पेगासस प्रकरणावर बोलण्यासाठी उभे राहिले असता तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनु सेन यांनी वैष्णव यांच्या हातातून कागद घेऊन तो फाडला.

तरी दीखेल वैष्णव बोलत राहिले पण, त्यांना आपले बोलणे मध्येच थांबवावे लागले. यानंतर भाजप आणि तृणमूल खासदारांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी मार्शलला पाचारण केले.

या गोंधळानंतर राज्यसभेची कार्यवाही उद्यापर्यंत स्थगित केली आहे. आज तिसऱ्यांदा सभागृहाची कार्यवाई थांबवली. सकाळी कार्यवाही सुरू झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला.

त्यामुळे पुन्हा दुपारी 12 वाजेर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत कार्यवाही स्थगित केली. तर, लोकसभेतही कार्यवाही सायंकाळी 4 वाजेपर्यंत स्थगित केली आहे.

Please follow and like us: