TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 4 ऑगस्ट 2021 – पेगॅसस प्रकरण संसदेच्या पावसाळी अधिवेशात खूप गाजत आहे. यामुळे काही खासदारांनी पेगॅसस प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली होती. यावरून संसदेच्या सभागृहामध्ये गदारोळ पाहायला मिळला. गदारोळ घातल्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी तृणमूल काॅंग्रेसच्या खासदारांना एका दिवसासाठी निलंबित केलंय. तर, या पेगॅसस प्रकरणाबद्दल निलंबित केलेल्या खासदारांनी राज्यसभेमध्ये आवाज उठवला होता. तसेच यावर सर्वोच्च न्यायालयाने विशेष लक्ष द्यावं, अशी मागणी हि खासदारांनी केली आहे.

तसेच याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने देखील तपासणी करावी, अशी मागणी या खासदारांनी केली होती. त्यामुळे सभागृहातील वेलमध्ये प्रवेश करणे, फलक लावून घोषणा देेणे आणि नियम 255 अंतर्गत राज्यसभा अध्याक्षांच्या खूर्चीचा अपमान केल्यामुळे त्यांना निलंबित केलंय. सभागृहात आवाज उठविणाऱ्याचा आवाज दाबला जात आहे. हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

तृणमूल काॅंग्रेसच्या सदस्या डोला सेन, अर्पिता घोष, नदीम उल हक, अबीर रंजन बिस्वास, आणि मौसम नूर या खासदारांना सभागहात गदारोळ घालल्यामुळे व्यंकय्या नायडू यांनी सभागृहाच्या कामकाजातून त्यांना निलंबित केलंय.

सकाळी 11 वाजता संसदेच्या कामकाजाला सुरूवात झाल्यापासून सभागृहाच्या कामकाजात अडथळे येत होते. त्यात खासदारांनी घोषणाबाजी केली. त्याबाबतीत खासदारांना अध्याक्षांनी खाली बसण्यास सांगितले.

नियम 255 लागू करण्याचा इशारा दिला होता. परंतु खासदारांनी ऎकलं नाही, खासदारांच्या या गदारोळामध्ये संसद सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत अध्यक्षांनी तहकूब केलं होतं.