महाराज…तुमच्या नजरेतलं ‘स्वराज्य’ घडवायचंय! संभाजीराजेंची ‘ती’ पोस्ट व्हायरल

संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेची  निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने  दिलेला उमेदवारीचा प्रस्ताव स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर संभाजीराजे यांनी गुरूवारी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेनेकडून कोल्हापूर येथील संजय पवार यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी गुरूवारी फेसबुक व ट्विटरवर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेला त्यांचे छायाचित्र आहे.

 

संभाजीराजे यांची ही फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. तासाभरातच 10 हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली असून जवळपास 500 हून अधिक कमेंट आल्या आहेत. तसेच 200 जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ट्विटरवरही ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

Leave Your Comment