TOD Marathi

अनिल परब यांच्यासह मुंबईतील शिवसेनेच्या ‘या’ पदाधिकाऱ्याच्या घरी ईडीचा छापा. शिवसेना अनिल परब यांच्यासह मुंबईतील शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांच्या घरीदेखील ईडीने छापा मारला आहे. अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास छापा मारला. ईडीने अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापेमारीची कारवाई केली. अनिल परब यांच्यासह मुंबईतील आणखी एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याच्या घरी ईडीने छापा मारला आहे. अंधेरीतील शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.

संजय कदम हे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय आणि अंधेरी पश्चिम शिवसेना विभाग संघटक आहेत. संजय कदम यांच्या घरी सकाळी 6.30 वाजल्यापासून ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ईडीकडून कारवाई सुरू असल्याची माहिती मिळताच संजय कदम यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमा होऊ लागले आहेत.