TOD Marathi

आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने छापा मारला. या कारवाईमध्ये ईडीचे वरिष्ठ अधिकारीदेखील सहभागी आहेत. अनिल देशमुख यांच्या तपासातील मुख्य तपास अधिकारी ईडीचे सह-संचालक तासीन सुलतानदेखील अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान ‘अजिंक्यतारा’ येथे चौकशीसाठी दाखल झाले आहेत.

अनिल परब  संबंधित ‘या’ सात ठिकाणांवर छापा

1. अजिंक्यतारा, शासकीय निवासस्थान, मंत्रालयाजवळ

2. मोनार्क इमारत, खासगी निवास्थान, वांद्रे पूर्व

3. अनिल परबांशी संबंधित चेंबूरच्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी इडी छापे.

4. दापोलीतील साई रिसॉर्ट

5. दापोलीतील जमीन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांच्या कोथरुड येथील घरी

6. दापोलीतील जमिन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांचे कोथरुडमधील कार्यालय

7. शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांचे निवासस्थान, अंधेरी

त्याचबरोबर  पुण्यातही  ईडीची कारवाई

अनिल परबांनी पुण्यातील विभास साठे यांच्याकडून दापोलीतील रिसॉटसाठी जमीन खरेदी केली होती. याच पार्श्वभूमीवर या जमीन व्यवहाराच्या तपासासाठी ईडीचं पथक पुण्यात पोहोचलंय. साठे यांच्याकडून1 कोटी 10 लाखाला रिसॉर्टसाठी जमीन खरेदी केल्याचा आरोप सोमय्या यांनी परब यांच्यावर केलाय.