Toolkit Case : भाजपच्या संबित पात्रा यांना नोटीस; हजर राहण्याचे पोलिसांचे निर्देश

टिओडी मराठी, रायपूर, दि. 23 मे 2021 – टूलकिटवरून भाजपकडून काँग्रेसवर टीका केली जात आहे. आणि याला काँग्रेसकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. ट्विटरनेही याप्रकरणी भाष्य केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. अशात आता भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना नोटीस बजावून हजर राहण्याचे निर्देश रायपूर पोलिसांकडून दिले आहेत.

अलीकडे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी एक पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस टूलकिटचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारची प्रतिमा मलीन करीत आहे, असा दावा केला होता.

यावेळी भाजपचे संबित पात्रा यांनी काँग्रेसवर आरोप केले. यावरून संबित पात्रा यांच्याविरोधात काँग्रेस नेत्यांनी छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी संबित पात्रा यांना पोलिसांकडून नोटीस बजावली आहे. तसेच याप्रकरणी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

रायपूर पोलिसांनी टूलकिटप्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांना जबाब नोंदवण्यासाठी २४ मे रोजी हजर राहण्याचे निर्देश दिलेत. भाजपकडून केलेले आरोप काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. संबित पात्रा आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर नोंदवला आहे.

या दरम्यान, भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी कोरोनावरून सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवर हल्लाबोल केला. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काँग्रेसची एक कथिट टूलकिट दाखवली. यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका केली.

पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात अयोग्य शब्दांचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. इंडियन स्ट्रेनला मोदी स्ट्रेन म्हणायचे आहे. कुंभ मेळ्याला सुपर स्प्रेडरप्रमाणे सांगायचे आहे. परंतु ईदला काहीच म्हणायचं नाही, असे संबित पात्रा यांनी कथित टूलकिट दाखवताना म्हटले.

Please follow and like us: