नवी दिल्ली : नवज्योत सिंह सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयानं एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ३४ वर्ष जुन्या प्रकरणामुळे सिद्धू यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
1988 मध्ये झालेल्या एका पार्किंगच्या वादातून सिद्धू यांनी एका वृद्धाला मारहाण केली होती. उपचारा दरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला होता.
दरम्यान सिद्धू यांना याआधी कोर्टाकडून दिलासा मिळाला होता. मात्र पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं आता त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.