TOD Marathi

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा आता 22 मे रोजी होणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचमध्ये रविवारी सकाळी सहा वाजता राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

राज ठाकरे यांची सभा 21 मे रोजी मुठा नदी पात्रातील मैदानात पार पडणार होती. मात्र तब्येत ठीक नसल्यानं ठाकरे मुंबईला रवाना झाल्याने सभा रद्द झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.

मात्र आता राज यांची पुण्यातील सभा 22 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच इथे होणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. पुण्यातील सभेत राज ठाकरे नक्की काय बोलणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे.