मुस्लिम देशांनी भारताची केली कोंडी; मोहम्मद पैगंबर वादग्रस्त वक्तव्याचा ‘या’ देशांकडून निषेध

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर भाजपच्या नेत्यांच्या कथित टिप्पणीवरून आखाती देशांनी आता तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. इस्लामिक देशांमध्ये भारताला सध्या जोरदार विरोध होताना दिसत आहे. मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना निलंबित केले, तर नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टीही केलीली असली,तरी आखाती देशांमध्ये त्यांच्या विरोधात सुरू झालेला गोंधळ थांबताना दिसत नाही. विरोधकही भाजपवर टीका करत त्यांना तुरुंगात पाठवण्याच्या मागणीवर ठाम आहेत. (BJP Ledaers Controversial statement on Preshit Mohamad )

प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma ) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुस्लिम देश सातत्याने आक्षेप घेत आहेत. कतारने (katar) रविवारी सर्वप्रथम आपली नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर कुवेत, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तानसह सुमारे 15 देशांनी भारतावर आक्षेप घेतला आहे.

57 सदस्यीय इस्लामिक कोऑपरेशन संघटनेकडूनही पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. ओआयसीने संयुक्त राष्ट्रांना भारतातील मुस्लिमांना हक्क सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. (OPEC Union Also Oppose India )

ओआयसीने संयुक्त राष्ट्रांना भारतातील मुस्लिमांना हक्क सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची विनंतीही केली आहे. (OIC Oppose India )

भारताच्या विरोधात उभी राहिलेली राष्ट्रे

कतार
इराण
इराक
कुवेत
इंडोनेशिया
सौदी अरब
संयुक्त अरब अमिरात
बहरीन
अफगाणिस्तान
पाकिस्तान
जॉर्डन
ओमान
लिबिया
मालदीव

Please follow and like us: