मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरून बरीच चर्चा सुरू झालीय. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या घोडेबाजाराच्या आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. अशातच भाजपा नेते किरीट सोमय्यांनीही आता शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. ( Kirit Somyya statment on shivsena )
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोडेबाजाराचा आरोप होत असताना किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर ( Shivsena ) टीका केली आहे. सोमय्या म्हणाले की, मला हेच समजत नाहीये की काय चाललंय? औरंगाबादला (Aurangabad ) काय आमदार विकत घ्यायला चाललेत का? ही काय अवस्था झालीये शिवसेनेची? (Rajysabha election Maharashtra politics)
तसेच सरकारकडून जनतेचा जो पैसा वसुलीद्वारे आलाय, त्याचा उपयोग स्वत:च्याच आमदारांना विकत घेण्यासाठी माफिया सेना करतेय. इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय की स्वत:च्या आमदारांना स्वत:कडे ठेवण्यासाठी वसुलीच्या पैशांचा वापर केला जातोय, असंही सोमय्यानी म्हटलं आहे. (Kirit somyya allegation on Shivsena )
दरम्यान महाराष्ट्रात आम्ही फिरतो तेव्हा लोक आम्हाला प्रश्न विचारतात की स्वत:च्या आमदारांना बिकाऊ म्हणणारा हा मुख्यमंत्री? आमदारांना अँटिचेंबरमध्ये काय सांगत असतील, सौदेबाजी चालू असेल माहिती नाही. हे काय होतंय ठाकरे साहेब?” असा सवालही सोमय्यांनी (Kirit Somayya) विचारत शिवसेनेवर निशाणा साधलाय.