TOD Marathi

मुरबाड : तालुक्यातील धसई येथे एका बोगस डॉक्टरने चुकीचे इंजेक्शनछा वापर करून उपचार केल्यामुळे मुलगी-वडिलांसह तीन आदिवासींना आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सेवा निवृत्त शिपाई पांडूमामा घोलप याला धसई प्राथमिक आरोग्य केंद्रावरून अटक केली आहे.
याप्रकरणी डॉ.उमेश वाघमोडे यांच्या तक्रारीनुसार या बोगस डॉक्टर विरोधात टोकावडे पोलिस ठाण्यात भा.द.वी.304 (अ) 420 सह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियन 33 (2)(अ) 33(अ) 2 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिपायाने घरच्या घरीच दवाखाना सुरु केला आणि परवानगी नसताना देखील तो उपचार करत असल्याचं समोर आले आहे. . डॉ.नंदकिशोर गोरडे हे मंगळवारी २५ तारखेला ड्युटीवर असताना साडेदहाच्या सुमारास धसई चिखली येथील ही महिला आशा बुधाजी नाईक वय (30) पायाला दुखापत झाली असल्याने उपचार घेण्यासाठी ही महिला येथे आली होती. तीव्र वेदना होत असल्याने डॉ. गोरडे यांनी त्या महिलेला तपासले आणि कंबरेच्या मागील बाजूस इंजेक्शन दिले.नंतर त्या जागी सूज येऊन चामडी निघाली असल्याचे निदर्शनास आले. असाच काही प्रकार मिल्हे येथिल सावऱ्याची वाडी येथील रहिवासी असलेल्या रामा भिवा आसवले व त्यांची मुलगी अलका रामा आसवले या दोघांवर पांडुरंग घोलप यांनी 24 तारखेला उपचार करताना घडला होता. हे तिन्ही व्यक्ती चुकीच्या उपचाराचे बळी ठरले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.