TOD Marathi

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे म्हणत त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप आहेत. तसेच त्यांचे पब मालकांशी आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोपही आहेत. या प्रकरणी पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी एसीबीकडे तक्रार दाखल केली. याच प्रकरणी आता परमबीर सिंग यांना एसीबीकडून समन्स बजावण्यात आला आहे. यात त्यांना २ फेब्रुवारी रोजी जबाब नोंदवण्यास हजर राहण्याची सूचना दिली आहे. परमबीर सिंह यांनी यापूर्वी कोरोनाचे कारण देत दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला होता. त्यानुसार एसीबीने आता खुली चौकशी सुरू केली आहे, तर सीआयडीकडून ही या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.परमबीर यांना एसीबी कडून तिसऱ्यांदा हा समन्स बजावण्यात आला आहे.
मागच्यावर्षी पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांनी एक पत्र लिहित, या पत्रात त्यांनी परमबीर सिंग यांचे पब मालकाशी संबंध असल्याचे म्हणत चौकशीची मागणी केली होती. तसेच परमबीर सिंग यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचे म्हणत भ्रष्टाचाराचे आरोप केले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी परमबीर सिंह यांना एसीबीकडून समन्स बजावण्यात आला आहे.