टिओडी मराठी, मुंबई, दि. 1 जुलै 2021 – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये विविध घडामोडी घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्याचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ही भेट झालीय. शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात तासभर चर्चा झाली आहे. त्यामुळे याबाबत अनेक तर्क- वितर्क लावले जात आहेत.
या बैठकीत कशावर चर्चा झाली? याचा खुलासा स्वतः शरद पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत राजकीय चर्चा झाली नाही, असे स्वतः शरद पवार यांनी सांगितलं आहे.
आज शरद पवार यांच्या हस्ते डॉ. डी. वाय. पाटील कृषी व तांत्रिक विद्यापीठाचे उद्घाटन झालं. यावेळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी याबाबतची माहिती दिलीय.
यावेळी शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राजकीय चर्चा नाही. केवळ सरकार अधिक गतिमान व्हावी, यासाठी चर्चा झाली. तसेच काँग्रेस विधानसभा अध्यक्ष पदासाठी जो उमेदवार देईल, त्याला तिन्ही पक्ष समर्थन देतील, असेही शरद पवार यांनी म्हटलंय.
शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे :
# 56 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत.
# शेतीचे अर्थकारण सुधारणा करण्याशिवाय पर्याय नाही.
# शेती सुधारली तर अर्थकारण सुधारेल आणि बदलेल.
# कृषी क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता आहे.
# अन्नधान्य आयातापासून तांदूळ, साखरेचा मोठा निर्यातदार देश आहे.
# महाराष्ट्रात खासगी कृषी विद्यापीठ उभी राहिली आहेत.
# हे पहिले कृषी विद्यापीठ आहे.
# कृषी कायद्याबाबत मंत्रीगट स्थापन केला आहे, त्याचे बाळासाहेब थोरात अध्यक्ष आहेत.
# केंद्रीय कृषी कायद्याच्या तीन तक्रारी आहेत. कृषी कायदा लागू करू नये, या विषयी कायद्यामध्ये दुरुस्त करण्याविषयी या अधिवेशनात येईल का? हे बघावं लागेल.
# शेतकरी आंदोलनाला राजकीय लेबल लावू नका.
# दिल्ली आंदोलनामधील शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करायला हवी.