TOD Marathi

मुंबई: महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या प्रश्नाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी ज्येष्ठ मंत्र्यांची आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया दोन आठवडय़ांत सुरू करण्याचे आदेश काल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. या आदेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही, दोन आठवडय़ांत प्रक्रिया सुरू करायची म्हणजे नेमके काय होणार असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ग्रामविकास व नगरविकास या स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित खात्यांचे मंत्री, प्रमुख अधिकारी या बैठकीस उपस्थित असतील.