TOD Marathi

मध्य प्रदेशातून अमळनेरला येत असलेल्या एसटी महामंडळाच्या एका बसला भीषण अपघात झालेला आहे. (Bus accident took place, 13 died) रस्त्यावरील कठडा तोडून ही बस नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे, 15 लोकांना आतापर्यंत यामधून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर बसमधील अन्य काही प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत.

बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातोय आणि नियंत्रण सुटल्यामुळे ही बस खाली खोल नदीत कोसळली. एसटी महामंडळाची ही बस मध्य प्रदेशातील इंदोर मधून अमळनेरला येत होती. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केलेला आहे.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन्ही राज्यांचं प्रशासन बचाव कार्य युद्ध पातळीवर करत असून बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचं कार्य सुरू आहे. (Maharashtra and Madhya Pradesh state issued helpline number) अपघाताबाबत एसटी महामंडळाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने 022-23023940 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केला आहे. गाडीमध्ये असणारे चालक वाहक अंमळनेरचे असल्याची माहिती असून बस अपघातात 22 ते 25 जण मृत्यूमुखी होण्याची भीती असल्याचे अंमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी म्हटले.