TOD Marathi

नवी दिल्ली:

भाजपने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार दिल्यानंतर आता विरोधकांनीही उपराष्ट्रपतीपदासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. मार्गारेट अल्वा या विरोधी पक्षाच्या  उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. (Margaret Alva is the candidate of Vice President from opposition) सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली आहे. (Sharad Pawar announced) शनिवारी संध्याकाळी एनडीएने आपल्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची घोषणा केली. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. (Jagdip Dhankhad is the candidate of Vice President from NDA) त्यानंतर रविवारी विरोधी पक्षांची दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीत मार्गारेट अल्वा यांच्या नावावर एकमत झाले.

मार्गारेट अल्वा मूळच्या कर्नाटकच्या असून त्या गोव्याच्या राज्यपाल राहिल्या आहेत. मार्गारेट अल्वा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. आता त्या कॉंग्रेसमध्ये सक्रीय नाहीत. चारवेळा राज्यसभेच्या सदस्य राहिल्या आहेत तर ११९९ मध्ये लोकसभेच्याही सदस्या राहिल्या आहेत. राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिल्या आहेत. प्रदीर्घ राजकीय अनुभव, प्रशासनावर उत्तम पकड आणि कायद्याचं उत्तम ज्ञान असलेल्या नेत्या अशी मार्गारेट अल्वा यांची ओळख आहे. (Margaret Alva was MP five times, Governor, Union Cabinet Minister)

देशाचे विद्यमान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली असून नामांकनाची अंतिम तारीख १९ जुलै आहे. ६ ऑगस्ट रोजी ही निवडणूक होणार आहे.