TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 3 जून 2021 – कोरोनामुळे लागू केलेल्या निर्बंध आणि लॉकडाऊनचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. याचा वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या वसुलीवर अधिक परिणाम झालाय. राज्याच्या जीएसटी वसुलीत 36 टक्के घट झाली आहे.

एप्रिल-मेदरम्यान जीएसटीच्या वसुलीत 8130 कोटींची म्हणजे 36.4 टक्क्यांची घसरण झालीय. तथापि, मागील वर्षीच्या देशव्यापी लॉकडाऊनच्या काळातील मे महिन्याच्या तुलनेत राज्याने सुमारे 59 टक्के अधिक जीएसटी वसुली केलीय.

राज्यात एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यावेळी वाढलेला कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच उपाय सरकारपुढे शिल्लक राहिला होता. त्यामुळे सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले.

या निर्बंधांमुळे कोरोनाचा जोर ओसरला असला तरी याचा अर्थव्यवस्थेवर अधिक परिणाम झाला आहे. केला आहे. विशेषतः जीएसटी वसुलीवर परिणाम देखील झाला आहे.

मागील वर्षीच्या देशव्यापी लॉकडाऊनच्या काळात एप्रिल -मे या दोन महिन्यांत 13 हजार 12 कोटी इतकी जीएसटी वसुली झाली होती. यंदा राज्य सरकारने लॉकडाऊन लावल्यानंतरही या दोन महिन्यांत 35 हजार 412 कोटींची जीएसटी वसुली झालीय.

महाराष्ट्राची आघाडी :
महाराष्ट्राने जीएसटी वसुलीमध्ये इतर राज्यांच्या तुलनेत चांगले योगदान दिले आहे. 2019-20 मध्ये महाराष्ट्राने सुमारे 1.8 लाख कोटींची जीएसटी वसुली केली होती. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे पुढच्या आर्थिक वर्षात त्यात 20,609 कोटींची घसरण झाली. या वर्षात 1.6 लाख कोटींचा जीएसटी वसूल केली आहे.

केंद्राने रखडवले 24 हजार कोटी :
केंद्राकडे महाराष्ट्राची सुमारे 24 हजार कोटींची जीएसटी भरपाई रक्कम प्रलंबित आहे. ही रक्कम मिळवण्यासाठी राज्य सरकारला केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.