TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 3 जून 2021 – कार्यकुशल नगरसेविका लक्ष्मी दुधाणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना सेवा देणाऱ्या लढवय्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच पुढील तीन दिवस कर्वेनगर वारजे परिसरातील कोविड योद्ध्यांचा सन्मान केला जाणार आहे, असेही आयोजकांनी यावेळी सांगितले आहे.

आपल्या कर्तव्याचा, धाडसाचा योग्य वापर केल्यामुळे अनेकांना सेवा करण्याची प्रेरणा या लढवय्यांमुळे मिळाली आहे. त्यांच्या या बहुमुल्य कार्याबद्दल त्यांना आज सन्मानपत्र कृतज्ञतापूर्वक प्रदान केले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस कोथरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाणे यांनी म्हंटलं आहे.

यावेळी प्रमोद शिंदे, किशोर शेडगे, सचिन शिंदे, अमित गोडांबे, विशाल गायकवाड, प्रतिक पुंड, अनिल राठोड, स्वप्निल पाटील, आकाश गोळे, दिनेश तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.