TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 12 मे 2021 – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून सध्या लॉकडाउन नियमावली राबविली जात आहे. तरीही काही जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होताना दिसून येईना. त्यामुळे या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर राज्यातील लॉकडाऊन 31 मेपर्यंत वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

तसेच हा लॉकडाऊन काही दिवस यावा, अशी मागणी मंत्रिमंडळाने केलीय. मात्र, आता त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, लॉकडाऊननंतर राज्यातील अॅक्टिव रुग्णांची संख्या घटली आहे. भारतातील सरासरी रुग्णवाढीपेक्षा महाराष्ट्रातील रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होत आहे.

मात्र, काही जिल्ह्यामध्ये रुग्णवाढ होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काही दिवस वाढावावा, असा कल मंत्रिमंडळाने दर्शवला आहे. तसेच मुख्यमंत्र्याना सांगण्यात आले आहे. आता याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.

दरम्यान, मागील महिनाभरापासून महाराष्ट्रात लागू असलेले कठोर निर्बंध आणि लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम दिसू लागलेत. एप्रिल महिन्यात ६८ हजारांपर्यंत गेलेली दैनंदिन रुग्णवाढ घटून ४० हजारांपर्यंत आलीय. तसेच मागील काही दिवसांपासून कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.