TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 12 मे 2021 – कोरोना काळात सरकार नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेईल, अशी नागरिकांची अपेक्षा होती ती फेल ठरत आहे. एकीकडे केंद्रातील सरकार पेट्रोल-डिझेलची दरवाढ दिवसाला करत आहे. त्यामुळे महागाईत दिवसेंदिवस भर पडत आहे. या कोरोना काळातच गृहिणींचं बजेट देखील कोलमडत आहे. कोरोनाच्या अगोदर घरगुती गॅस 580 रुपयांला मिळत होता तोच गॅस आता 810 रुपयांला मिळत आहे. इतकी महागाई वाढत गेली आहे. तरीही हे केंद्रातील सरकार या गोंष्टींकडे लक्ष देईना, अशी स्थिती आहे. त्यामुळे या सरकारला हि जनता माफ करेल का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाशी लढत लढत प्रत्येकाची परिस्थिती बिघडत चालली आहे. भारताची स्थितीही अत्यंत वाईट आहे. मार्च 2020 मध्ये देशात लॉकडाऊन लावला. पहिल्या लाटेत लोकांना खूप त्रास झाला. परंतु दुसऱ्या लाटेमुळे आणखी परिस्थिती बिकट झाली.

लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. छोट्या व्यावसायिकांची आणि असंघटित क्षेत्रात काम करणार्‍यांची अवस्था फार बिकट झाली आहे. ज्या पद्धतीने खाद्यपदार्थ आणि गॅसच्या किमती वाढत आहेत, त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे.

… अखेर चुलीत गेली ‘ती’ योजना :
सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना सुरू केली आणि त्याअंतर्गत घरात गॅस सिलिंडरचे वितरण केले. पीएम नरेंद्र मोदी यांनी वर्षानुवर्षे स्टोव्हवर स्वयंपाक करत असलेल्या देशातील गरिबांना गॅस सिलिंडर पोहोचविण्याचे काम केले. खरंतर ते कौतुकास्पद आहे. मात्र, मागील एका वर्षात गॅसच्या किमतीत मोठी वाढ केली.

14.20 किलो विनाअनुदानित गॅस सिलिंडर्सची किंमत दिल्लीत 809 रुपये, कोलकातामध्ये 835.50 रुपये, मुंबईत 809 रुपये आणि चेन्नईमध्ये 825 रुपये इतकी केली आहे. त्यामुळे लोकांना पुन्हा चुलीवर जेवण बनविण्याची वेळ या मोदी सरकारने आणली आहे. म्हणूनच … अखेर चुलीत गेली ‘ती’ योजना, असं म्हणावं लागत आहे.

जाणून घ्या, अशी वाढली घरगुती गॅसची किंमत
फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीमध्ये या सिलिंडरची किंमत 858 रुपये होती. मार्चमध्ये ते कमी करून 805.50 रुपयांवर आली. लॉकडाऊन 25 मार्च रोजी जाहीर केले आणि त्यानंतर किमती खाली येण्यास सुरुवात झाली. त्याची किंमत एप्रिलमध्ये 744 रुपये आणि मेमध्ये 581 रुपये झाली.

नोव्हेंबरपर्यंत किमतीत किंचित वाढ झाली आणि ती 594 रुपयांच्या पातळीवर राहिली. डिसेंबरपासून किमतीचा भडका उडाला आणि डिसेंबरमध्ये किंमत 50-50 रुपयांनी वाढली आणि ती 694 रुपयांच्या पातळीवर गेलीय. तर फेब्रुवारीमध्ये किंमत तीन वेळा वाढली आहे. आणि 794 रुपयांच्या पातळीवर पोहोचली.

मार्चमध्ये ती 819 रुपयांवर पोहोचली जी एप्रिलपर्यंत होती. मे महिन्यामध्ये या किमतीत 10 रुपयांची कपात केली होती. यावेळी दिल्लीत त्याची किंमत 809 रुपये इतकी आहे.