Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
TOD Marathi - लोकांकडून लोकांसाठी टॉप मराठी बातम्या

TOD Marathi

टिओडी मराठी, काबुल, दि. 19 ऑगस्ट 2021 – अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी पैशांच्या अनेक बॅगा घेऊन देशातून पळ काढल्याचे आरोप फेटाळून लावलेत. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, असे घनी यांनी म्हटलं आहे. तसेच हे आरोप राजकीय हेतूने व छवी बिघडवण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप घनी यांनी केल्याचे अल झजीराने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

काबूलमधील रशियन दुतावासाने घनी हे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आपल्या सोबत घेऊन गेल्याचा आरोप केला होता. कार आणि हेलिकॉप्टरमधून घनी पैसे घेऊन देशातून पसार झाल्याचा दावा केला होता.

एकीकडे देशातील सरकार कोसळत असताना दुसरीकडे घनी हे देशामधून पळून गेलेत. त्यांनी चार वाहने भरुन रोख रक्कम नेली. हे सर्व पैसे हेलिकॉप्टरमध्ये भरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सर्व पैसा हेलिकॉप्टरमध्ये मावला नाही.

त्यामुळे काही पैसा धावपट्टीवर सोडून दिला, असा दावा रशियाचे अफगाणिस्तानमधील प्रवक्ते निकिता इंश्चेन्को यांनी केल्याचे स्पुटनिकच्या वृत्तात म्हटलं होतं.

मात्र, घनी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे, एक पारंपारिक कपड्यांचा जोड, एक कोट व घातलेल्या सॅण्डल एवढ्या तीन गोष्टी सोबत घेऊन मी देश सोडला, असे घनी यांनी म्हटल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे.

राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीत आहेत. संयुक्त अरब अमिराती (यूएई) च्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मानवतेच्या आधारावर युएई राष्ट्रपती अशरफ घनी व त्यांच्या कुटुंबाला आश्रय देत आहे, असे यूएईने म्हटलं आहे.

२० वर्षांच्या लढाईनंतर अखेर रविवारी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. देशामध्ये हिंसाचाराला सामोरे जावं लागू नये म्हणून अनेकांनी देश सोडला. राष्ट्रपती अशरफ घनी देखील देश सोडून पळून गेलेल्यांमध्ये आहेत.

तालिबानने अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर ताबा मिळवलेला असताना देशाच्या पूर्व भागामध्ये नागरिकांनी बुधवारी दर्शवलेला विरोध या दहशतवादी संघटनेने हिंसकरीत्या मोडून काढला. यात एकजण ठार, तर सहाजण जखमी झाले.

अफगाणिस्तानातील ब्रिटिश राजवट १९१९ साली ज्या दिवशी संपुष्टामध्ये आली, तो देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक दिवस अगोदर अनेक नागरिक पूर्व भागातील जलालाबादमध्ये गोळा झाले होते. तालिबानने या भागावर नियंत्रण मिळवल्यानंतर तेथे उभारलेला झेंडा या लोकांनी खाली उतरवला होता.

गोळा झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी तालिबानी हवेत गोळीबार करत असल्याचा आणि लोकांवर हल्ले चढवत आहेत, असे व्हिडीओ चित्रीकरणात दिसून आले.

या असंतोषाचे चित्रीकरण करू पाहणाऱ्या एका पत्रकारासह टीव्ही कॅमेरामनला दहशतवाद्यांनी मारहाण केली आहे. या हिंसाचारामध्ये किमान १ जण ठार, तर सहा जण जखमी झाल्याचे आरोग्य विभागाच्या एका स्थानिक अधिकाऱ्याने ओळख उघड न करण्याच्या अटीवर सांगितले आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज