TOD Marathi

टिओडी मराठी, काबुल, दि. 19 ऑगस्ट 2021 – तालिबानने अफगाणिस्तान देशावर कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह देश सोडून पळाले. सध्या ते अबू धाबीमध्ये आहेत, अशी माहिती समोर आली आहे. संयुक्त अरब अमीरात (यूएई) च्या विदेश मंत्रालयाने या वृत्ताला दुजोरा दिलाय. तसेच युएईने घनी यांना आश्रय का दिला? यावरही स्पष्टीकरण दिलं आहे.

यूएईच्या विदेश मंत्रालयाकडून जारी केलेल्या माहितीनुसार, मानवतेच्या दृष्टिकोनातून अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना आश्रय दिलाय. यादरम्यान, अशरफ घनी आणि त्यांचे कुटुंबिय अबू धाबीमध्ये नक्की कोणत्या भागांमध्ये आहे?, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

संयुक्त अरब अमीरात (यूएई) ने असे म्हटले आहे की, त्यांनी अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी व त्यांच्या कुटुंबियांना मानवतेच्या दृष्टिकोनातून स्विकारलं आहे. म्हणून त्यांना आश्रय दिला आहे.

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला आहे. त्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलवर कब्जा केला. देश सोडल्यानंतर आता अशरफ गनी यांनी स्वतः खुलासा केलाय. या खुलासात त्यांना अफगाणिस्तान का सोडावे लागले? हे फेसबूकवर पोस्ट करत सांगितलं आहे.