TOD Marathi

टिओडी मराठी, किन्नौर, दि. 25 जुलै 2021 – हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यामध्ये भूस्खलनामुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून तर तिघे गंभीर जखमी झालेत. किन्नौर जिल्ह्यामध्ये बटसेरीच्या गुंसाजवळ छितकुलहून सांगलाकडे जाणारी पर्यटकांची वाहन भूस्खलनात सापडली आहे. यात वाहनावर मोठ-मोठे दगड पडून 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे गंभीर जखमी झालेत. हे पर्यटक दिल्ली आणि चंदिगडहून हिमाचल प्रदेशामध्ये फिरण्यासाठी गेले होते.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे चमू घटनास्थळी पोहोचले. काँग्रेस आमदार जगत सिंह नेगी यांनी दिलेली माहिती अशी, पहाडांवरून दगड पडत आहेत. यामुळे रेस्क्यूत अडचण येतेय.

तसेच, जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी सरकारकडे हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. ते लवकरच पोहोचेल, असे आश्वासम मिळाले. किन्नौरचे डीसी आबिद हुसैन सादिक, एसपी एसआर राणा हे घटनास्थळी दाखल होते.

या घटनास्थळी बटसेरीतील लोक पोलिसांना रेस्क्यूसाठी मदत करत आहेत. भूस्खलनामुळे गावासाठी बास्पा नदीवर तयार केलेला कोरोडो पूलही तुटलाय. यामुळे गावाचा संपर्कही तुटला आहे. भूस्खलनासह पहाडावरून मोठ-मोठे दगड पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झालं आहे.

तथापि, पाऊस सुरू असल्याने प्रशासनाने पर्यटक व स्थानिक लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. लोकांना नदी व नाल्यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे. तसेच, उपायुक्त नीरज कुमार म्हणाले, ढगफुटीमुळे खराब झालेला रस्ता पूर्ववत केला जाणार आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज