TOD Marathi

Himachal Pradesh Election 2022:

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) हिमाचल विधानसभा निवडणुकीची (Himachal Pradesh Election) घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक ही एकाच टप्यात होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 2017 च्या विधानसभा निवडणुका चार टप्प्यात झाल्या. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे तर 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.  8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये 55 लाख 07 हजार 261 मतदार आहेत. यामध्ये 27 लाख 80 हजार पुरुष मतदार आहेत तर 27 हजार 27 महिला मतदार आहेत. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या एक लाख 86 हजार इतकी आहे.

हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ येत्या जानेवारी महिन्यात संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे. मागील निवडणुकीत भाजपने एकूण 68 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. आता यंदाच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बहुमतासाठी 35 जागांची गरज आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत 75.28 टक्के मतदान झाले.

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या महत्वाच्या तारखा

अर्ज भरण्याची सुरुवात- 17 ऑक्टोबर 2022

अर्ज भरण्याची शेवटची तारीख- 25 ऑक्टोबर 2022

अर्जाची छानणी- 27 ऑक्टोबर 2022

नाव माघारी घेण्याची मुदत- 29 ऑक्टोबर 2022

मतदान- 12 नोव्हेंबर 2022

मतमोजणी/निकाल- 8 डिसेंबर 2022